
दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये धनगर समाजाचे मोठे प्राबल्य
प्रतिनिधी: महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत असून पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी माळशिरस तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गट तसेच अठरा पंचायत समिती गटामध्ये गाव भेट दौरा पूर्ण केला असून त्या गाव भेट दौऱ्यामध्ये पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे,त्यामध्ये संग्राम नगर जिल्हा परिषद गटामध्ये तसेच निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये धनगर समाजाचा उमेदवार देण्याची तयारी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.या मतदारसंघांमध्ये धनगर समाजाचे प्राबल्य जास्त असल्याने या गटांमध्ये धनगर समाजाचे मतदान खेचून आणण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्ष सत्ताधाऱ्याची डोकेदुखी ठरणार की विरोधकांची डोकेदुखी ठरणार हे निवडणुकीच्या रणांगणामध्ये पाहायला मिळेल.अकलूज नगरपरिषद निवडणुकीत मविसेच्या एन्ट्रीने विरोधी गटातील तीन उमेदवारांचा पराभव झाला असून सत्ताधारी पार्टीच्या एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला आहे,त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास सेना पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.