
विविध मागण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात दिले निवेदन
प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे नूतन माढा विधानसभा संघटक राहुल साठे यांनी बोरगाव गावच्या विविध मागण्या असलेले निवेदन दिले आहे.तसेच सदर निवेदन हे अकलूज पोलीस स्टेशनचे निरीक्षक नीरज उबाळे,बोरगाव ग्रामपंचायत चे ग्रामसेवक व सरपंच यांनाही देण्यात आले.निवेदनात सोलापूर जिल्हा व माळशिरस तालुक्यातील बोरगांव ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिनांक ७/०१/२०२६ रोजी विविध मागण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण आयोजित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना कळविण्यात आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात बोरगांव येथील स्मशानभूमीची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.अवैध दारू धंदे बंद करण्यासाठी दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात यावा.समाज मंदिराला संरक्षक भिंत बांधण्यात यावी.अंबाबाई मंदिराला तात्काळ गेट बसविण्यात यावे.बोरगाव गावातील अवैध्य दारू धंदे कायमचे बंद करणेबाबत. या मागण्या करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे राहुल साठे यांनी सांगितले. निवेदनाच्या प्रति मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई,जिल्हाधिकारी सो,सोलापूर ,मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद,पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अकलूज पोलीस स्टेशन यांना पाठविण्यात आल्या आहेत.