शिक्षण विभागातील भष्टाचाराच्या चौकशी करावी– अवधूत गडकरी
वार्ताहर पंढरपूर गटशिक्षणाधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांनी नगरपरिषद हद्दीतील शालेय पोषण आहाराचे कामकाज हाती घेतले आहे.
वास्तविक प्रशासन आधिकारी कार्यरत असून देखील गटशिक्षणाधिकारी यांची पंढरपूर च्या हद्दीत असलेली शालेय पोषण आहारामध्ये ऐवढी रुची का असा प्रश्न निर्माण होतो . तसेच शाळा भेटी आर.टी.ई २५ टक्के प्रवेशाबाबत गटशिक्षणाधिकारी हे उघड उघड पैशाची मागणी करतात असे निदर्शनास येते व त्यासाठी शिक्षक ,कर्मचारी सेवेसाठी असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटलेत आहे.याबाबत पंचायत समिती सभापती अर्चना व्हरगर यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी यांच्या भष्टाचाराबाबत सखोल चौकशी करून लवकरात लवकर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अन्यथा संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पंढरपूरकडून येत्या १५ जूलै रोजी सभापती व गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर तिव्र स्वरुपाचे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून आशयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी मनविसे सोलापूर जिल्हा संघटक सागर बडवे व पंढरपूर शहराध्यक्ष प्रताप भोसले, पंढरपूर शहर संघटक शैलेश धट आणि पंढरपूर शहर उपाध्यक्ष अवधुत गडकरी हे सर्व उपस्थित होते.