लॉकडाऊन करण्यापूर्वी छोट्या व्यावसायिकांना महिना 5000 द्या – हवेली भाजपा
फुरसुंगी प्रतिनिधी – लॉकडाऊन केल्याने छोट्या व्यावसायिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुसकान होणार आहे,त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे या मध्ये
कुंभार व्यवसायिक ,लॉन्ड्री व्यवसायिक ,चर्मकार व्यवसायिक ,सलून व्यवसायिक ,लोहार व्यवसायिक ,सुतार व्यवसायिक ,टेलर व्यवसायिक ,हॉटेल व्यवसायिक ,मंडप व्यवसायिक ,कॅटर्स व्यवसायिक ,बँड बॅन्जो व्यवसायिक ,नाट्य-चित्रपट कलाकार ,बिगारी कामगार ,हातगाडीवाले-फेरीवाले व्यवसायिक ,झेरॉक्स दुकानदार ,पान टपरीवाला व्यवसायिक ,घर काम करणाऱ्या भगिनी ,शेतमजूर-शेतकरी लाॅकडाऊन केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे त्यामुळे
अशा सर्वांना लॉकडाउन करण्यापूर्वी महिना 5000 पॅकेज उपलब्ध करून द्यावे,अशी मागणी माननीय तहसीलदार हवेली यांच्याकडे भाजपा मध्य हवेली तालुका अध्यक्ष धनंजय कामठे व भाजपा युवा मोर्चा मध्य हवेली तालुका अध्यक्ष सचिन हांडे यांनी केली.
