
लक्षवेधी सेनेचे दिनांक १३/७/२०२० रोजी माळशिरस कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
प्रतिनिधी—
माळशिरस तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना माळशिरस तालुक्यातील सर्व प्रकारच्या केलेल्या विकास कामाची माहिती मिळावी यासाठी लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे यांनी अर्ज देऊन मागणी केली होती.
मात्र माळशिरस तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या कडून माहिती देता येत नाही अशा स्वरूपाचे पत्र देण्यात आलेआहे,त्यामुळे तालुका कृषी अधिकारी माळशिरस ये कार्यालयीन माहिती लपवत आहेत अशी शक्यता नाकारता येत नाही,तसेच आम्ही मागणी केलेल्या माहितीच्या संबंधित कामामध्ये मोठ्या प्रमाणात गौडबंगाल असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आम्ही संबंधित विभागाकडून मागितलेली माहिती मिळावी या मागणीसाठी दिनांक 13/7/2020 रोजी माळशिरस तालुका कृषी अधिकारी कार्यालय समोर लक्षवेधी सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष अनिल साठे यांनी दिला आहे.