राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी केली किरण साठे यांच्या कामाची स्तुती
प्रतिनिधी—सोलापूर—राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे एकनिष्ठ व खंदेसमर्थक तसेच विश्वासू म्हणून ओळखले जाणारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष व सोलापूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या कामाची स्तुती केली आहे,सतत सर्वसामान्य जनतेचे विषय घेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आंदोलन,उपोषण,मोर्चे काढून न्याय देण्याचा प्रयत्न करीत असुन पक्षाच्या माध्यमातून सामाजिक काम करून सतत सक्रियपणे काम करीत असल्याचे दिसून येत आहे असे बळीराम काका साठे यांनी मत व्यक्त केले.
माळशिरस तालुक्यातील प्रस्थापित मंडळींना न घाबरून जाता आपल्या पक्षाचे काम सुरू ठेवले असल्याने व पक्षाच्या विरोधात माळशिरस तालुक्यातील भाजपच्या लोकांनी वक्तव्य केल्यास आपण त्याचा खरपूस समाचार घेत असल्याचे दिसून आले आहे,तुमच्या पाठिशी शरद पवार,अजित पवार यांचा आशीर्वाद असल्याने आपण आपले पक्षाचे काम एकनिष्ठपणे पार पडावे आपल्या कामाची पावती ही आपल्याला नक्कीच मिळेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष व सोलापूर जिल्हा परिषदेचे विरोधीपक्षनेते बळीराम काका साठे यांनी मत व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांचे कौतुक करून त्यांच्या कामाची स्तुती केली.
