राम गायकवाडला दिसेल तिथे ठोकून काढणार–आनंद मिसाळ
प्रतिनिधी–सोलापूर—छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये फुले,शाहू,आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून संपूर्ण देशात आपल्या राज्याची ओळख आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये,फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा हा महाराष्ट्र आहे,पिंपरी चिंचवड मध्ये दलित समाजाच्या विराज जगताप याचा निर्घृण खून करण्यात आला त्याच्या अनुषंगाने पंढरपूर तालुक्यातील राम गायकवाड नावाचा निर्लज्ज माणूस हा दलित समाज व सवर्ण समाजामध्ये दरी निर्माण करण्याच्या उद्देशाने जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून त्याने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेत अनुसूचित जाती-जमाती साठी दिलेल्या कायद्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे,त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत असल्याचे बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ यांनी सोलापूर लाईफ शी बोलताना सांगितले.
दोन वर्षांपूर्वी बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी या संघटनेची स्थापना केली आहे,या संघटनेच्या माध्यमातूनछत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये फुले,शाहू,आंबेडकर,अण्णाभाऊ साठे तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महामानवाच्या विचाराने ही संघटना चालविली जाईल असे सांगितले होते.
या संघटनेच्या माध्यमातून सर्व समाजामध्ये एकी निर्माण करण्याचे ध्येय व दलित समाजामध्ये व सवर्ण जातीमध्ये कोणी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याला तांदळातून खडा जसा आपण बाजूला करतो तसा त्या व्यक्तीला बाजूला करावे हे संघटनेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी सांगितले होते.
पंढरपूर तालुक्यातील राम गायकवाड नावाच्या व्यक्तीने दलित समाजामध्ये व सवर्ण समाजामध्ये वाद लावण्याच्या हेतूने दलित समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली आहे.
राम गायकवाड हा व्यक्ती मला माळशिरस तालुक्यामध्ये कुठेही दिसल्यास त्याला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही असे रोखठोक मत बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ यांनी सोलापूर लाईफ शी बोलताना व्यक्त केले.
