राज्य पातळीवरील नेत्यामुळेच औरंगाबाद मध्ये गटबाजी

राज्य पातळीवरील नेत्यामुळेच औरंगाबाद मध्ये गटबाजी

जिल्हाध्यक्ष केलेल्या पदाधिकारी यांच्याकडून लक्ष्मी दर्शन झाल्यानेच मोर्चा काढल्याची औरंगाबाद मध्ये चर्चा

प्रतिनिधी : औरंगाबाद : राज्य पातळीवर असलेल्या नेत्याने औरंगाबाद मध्ये दौरा केला आणि तेथे ही स्वतःचे अस्तित्व वाढविण्यासाठी गटातटाचे राजकारण करून सोलापूर जिल्ह्यातील गटबाजी सारखे वातावरण निर्माण केले आहे.राज्य पातळीवर असलेला नेता हा प्रसिद्धीसाठी हापापलेला असून त्याला स्वतःच्या प्रसिद्धीपुढे सर्व गोष्टी गौण आहेत,त्यानेच औरंगाबाद बध्ये गटबाजी केली असल्याची माहिती औरंगाबाद येथील राज्य पातळीवर असलेल्या नेत्याच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी दिली आहे.त्याच्या सांगण्यावरूनच नवीन जिल्हाध्यक्ष यांनी काही कार्यकर्ते यांच्या हकालपट्टी केल्याचे पत्र काढले आहे,त्या पत्रामध्ये राज्य पातळीवर असलेल्या नेत्याचे बोल असल्याचेही कार्यकर्त्यानी सांगितले आहे.असाच प्रकार राज्य पातळीवर असलेला नेता स्वतःच्या जिल्ह्यातील चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत करीत होता,राज्य पातळीवर असलेल्या नेताचा उदो उदो न केल्यास असेच प्रकार त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यात केले असल्याचे अनेकवेळा पहायला मिळाले आहे.

राज्य पातळीवर असलेल्या नेत्याने औरंगाबाद मध्ये चालू जिल्हाध्यक्ष यांना हटविण्यासाठी नवीन नियुक्ती केलेल्या जिल्हाध्यक्ष यांच्याकडून आर्थिक रसद मिळवून त्यांना जिल्हाध्यक्ष केले असल्याची चर्चा त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चालू आहे.जाईल तिथे स्वतःच महत्व वाढविण्यासाठी राज्य पातळीवर असलेल्या नेत्याने पक्षामध्ये दोन गट निर्माण केले आहेत,प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता आशा गटबाजीला कंटाळून पक्ष सोडून जातो मात्र राज्य पातळीवर असलेल्या नेत्याला त्याचा काही फरक पडत नाही,त्याचा उलट पक्षाकडे येणारे कार्यकर्ते नव्याने येण्यासाठी धजवत नाहीत त्याचा तोटा हा पक्षाला होत आहे,त्यामुळे महाराष्ट्र राज्यात ज्या ठिकाणी हा नेता जाईल त्या ठिकाणी पक्षाची अधोगती नक्कीच होणार अशी भावना त्यांच्याच तालुक्यातील राज्य पातळीवर असलेल्या नेत्याच्या कार्यकर्त्यामधून बोलली जाऊ लागली आहे,तसेच औरंगाबाद मध्ये जिल्हाध्यक्ष केलेल्या नवीन पदाधिकारी यांच्या कडून लक्ष्मी दर्शन झाल्यानंतरच राज्य पातळीवर असलेल्या नेत्याने मोर्चा काढला असल्याची चर्चा औरंगाबाद मधील कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom