युवा सेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी आकाश माने

युवा सेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी आकाश माने

प्रतिनिधी : पंढरपूर : मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते,युवासेना प्रमुख ,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील युवा सेनेच्या पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने पहिली निवड ही पंढरपूर येथील युवा कार्यकर्ते व ग्राहक संरक्षण विभागाचे जिल्हाप्रमुख जयवंत माने यांचे चिरंजीव आकाश माने यांची उपजिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे,आकाश माने यांच्याकडे पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.सदर निवडी युवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आली आहे.

आकाश माने हे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी शिवसेना व युवा सेनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केले असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अविरत पणे काम केले आहे आणि सद्या चालूच आहे,त्यामुळे त्यांच्या कामाची पावती म्हणून आकाश माने यांना युवा सेनेने मोठी जबाबदारी दिली असल्याने त्यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom