
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विरोधात मविसेचे मंत्रालयासमोर धरणे आंदोलन
कारवाईचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित
मात्र २५ मे पर्यत कारवाई न झाल्यास २६ मे पासून पुन्हा मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा खरे यांचा इशारा
प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा,माढा,करमाळा,सांगोला,बार्शी,कार्यालयातील दुय्यम निरीक्षक यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्या हद्दीत चालू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्री,निर्मिती व वाहतूक कायमची बंद करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांच्या नेतृत्वाखाली दि.२० मे रोजी मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.सोलापूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मंगळवेढा,माढा, करमाळा,सांगोला,बार्शी,कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारू निर्मिती,विक्री,वाहतूक केली जात आहे,या सर्व काही ठिकाणी बनावट दारू निर्मिती झाल्याचे निष्पन्न झालेली आहे, मंगळवेढा,माढा, करमाळा,सांगोला,बार्शी,तालुक्यातील अनेक गावांत दारू निर्मिती,विक्री केली जाते आहे,मात्र राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असून त्यांना हप्ते स्वरूपात रक्कम दिली जात असल्याचे दारू विक्री,निर्मिती व वाहतूक करणारे दारू माफिया उघडपणे बोलतात मात्र त्यांच्यावर जीवनास घातक पदार्थ विकण्याच्या जुन्या भारतीय संहिता कलम ३२८ प्रमाणे गुन्हे दाखल केले जात नाहीत त्यामुळे त्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बाबतीत मनामध्ये भीती राहिली नाही त्यामुळे अशा बेकायदेशीर दारू विक्री,निर्मिती,वाहतूक करणाऱ्या दारू माफियांवर जुन्या भारतीय संहिता नुसार भां द वि कलम ३२८ नुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत.अशी मागणी करण्यात आली.मंत्रालायमध्ये भेटी दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप सचिव यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.२५ मे पर्यंत कारवाई न केल्यास २६ मे पासून पुन्हा धरणे आंदोलन करण्याचा इशारा राजेश खरे यांनी दिला आहे.