युवासेना पंढरपूर विभागाच्यावतीने राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडूंचा निषेध करत तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी सचिन रणदिवे
राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषानंतर अपशब्द वापरल्याने युवासेनेचे सोलापूर जिल्हा युवा अधिकारी स्वप्नीलभैया वाघमारे यांनी माळशिरसचे तहसीलदार अभिजीत पाटील यांना प्रांताधिकारी शमा पवार यांच्या समक्ष निवेदन दिले.
नायडू यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे. सदर निवेदनात अवघ्या हिंदुस्तानाचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वंशज असलेले छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांनी नुकतीच राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली. खा. उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष केला. अवघ्या जगाला अभिमान असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या कशाबद्दल आक्षेप नोंदवत उदयनराजे यांना “हे घर नाही, हे माझे दालन आहे. इथे बाकीच्या घोषणा चालणार नाहीत, तुम्ही नवीन आहात, पुढच्या वेळी लक्षात ठेवा”, असे खडे बोल सुनावले. छत्रपती उदयनराजे भोसले भलेही भारतीय जनता पक्षात असोत, मात्र शिवरायांचे वंशज म्हणून सातारा गांधीचा आम्हाला अभिमान आहे. शपथविधी प्रसंगी झालेला अपमान केवळ उदयन महाराजांचा नसून तो छत्रपतींच्या गादीचा आहे, असे आम्ही मानतो. या अपमानाचा युवासेना सोलापूर जिल्हा पंढरपूर विभाग निषेध करत आहे. राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी आपले आक्षेपाचे शब्द मागे घ्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी युवासेना जिल्हायुवाधिकारी स्वप्निल वाघमारे, युवासेना अकलूज शहर समन्वयक अचल गांधी, माळशिरस शहर समन्वयक सोमनाथ शिंदे, प्रहार विध्यार्थी सेनेचे किरण भांगे, अतुल माने उपस्थित होते.
