महाव्दार काल्याच्या प्रकरनातील गुन्हे त्वरित माघे घ्या— ओंकार देसाई

महाव्दार काल्याच्या प्रकरनातील गुन्हे त्वरित माघे घ्या— ओंकार देसाई

प्रतिनिधी —पंढरपूर—विश्वक्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने आज प्रांत साहेबांना निवेदन देण्यात आले
गेली चार महिने कोवीड १९ ( कोरोना) च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने लाॅकडाऊन जाहीर करण्यात आलेले असून त्यासाठी नागरिकांना अनेक निर्बंध लादण्यात आलेले आहेत.या सर्वांना वारकरी संप्रदायाने सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका शासन व प्रशासनासोबत घेतली चैत्र वारी ते आषाढी वारी पंढरपूरात कोणीही वारकरी नी येऊ नये अशा पध्दतीने आव्हान करत प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा ताण वारकरी संप्रदाया कडून येणार नाही याची काळजी घेण्यात आली. वारकरी संप्रदायाच्या प्रथा परंपरा ज़ोपासण्यासाठी शासनाने जे नियम आखून दिले त्या नियमांचे तंतोतंत पालन करत कुठेही संघर्षाची भूमिका न घेता सर्व परंपरा अगदी प्रातिनिधिक स्वरूपात मध्ये प्रसंगी पायी वारी सारख्या परंपरा खंडित करून वारकरी संप्रदायाने महाराष्ट्र शासन पोलीस प्रशासन यांना अंत्यत मोलाचे सहकार्य केलेले आहे.
मात्र श्री संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पार पडलेल्या महाव्दार काला आषाढी वारीच्या सांगता कार्यक्रमात सहभागी असणारे श्री संतनामदेव महाराजांचे वंशजांवर तसेच महाव्हार काल्याचे मानकरी हरिदास महाराज यांच्यावर गुन्हे दाखल करून प्रशासनाने संप्रदायाने केलेल्या सहकार्याचा विसर पडला असल्याने इतकेच काय तर केलेल्या सहकार्याबद्धल चे हे फळ/ बक्षीस देण्यात आले आहे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर प्रकारामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या असून सदर प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत अजूनही प्रशासनाने वेळ न दवडता सदरचे गुन्हे मागे घेऊन वारकरी संप्रदायाच्या भावनांचा सन्मान करावा नाहीतर विश्वक्रांती सामाजिक संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल यावेळी संस्थापक अध्यक्ष दिलीप मलपे ,उपाध्यक्ष संदीप शिंदे ,सचिव भाऊराव जाधव, जिल्हाउपाध्यक्ष सुरज चौधरी, शहराध्यक्ष ओंकार देसाई, कृष्णा कवडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom