
यशवंतनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने २७ कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू वाटप
प्रतिनिधी—लॉक डाउन व संचारबंदी मुळे सर्वसामान्य जनतेला हाताला काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे,त्यांना मदतीचा हात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी यशवंतनगर येथील विविध भागात २७ कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडच्या वतीने यशवंतनगर,येथील विविध भागात गरजू,गोरगरीब,निराधार,ज्यांना रेशनकार्ड नाही व खरोखरच ज्यांना गरज आहे,आशा २७ कुटुंबाना पाच किलो गहू,तीन किलो तांदूळ,अंगोळीचा एक साबण,कपडे धुण्याचा एक साबण व एक कोलगेट टूथपेस्ट प्रत्येकी एका कुटुंबाला वाटप करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे,बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आनंद एकतपुरे,माढा लोकसभा अध्यक्ष सोमनाथ शेळके,बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,उपाध्यक्ष बंडू कांबळे इत्यादी उपस्थित होते.