नातेपुते मंडलाधिकारी श्री संदीप चव्हाण यांची दप्तर चौकशी करून कारवाई करावी—किरण साठे

नातेपुते मंडलाधिकारी श्री संदीप चव्हाण यांची दप्तर चौकशी करून कारवाई करावी—किरण साठे

प्रतिनिधी—नातेपुते येथील मंडलाधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून व नातेपुते मंडल मध्ये रुजू झाल्यापासून आजपर्यंत केलेल्या कामाची दप्तर तपासणी करून दोषी आढळल्यास त्यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व माळशिरस तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे,आर पी आय गवई गटाचे जिल्हा कार्यध्यक्ष बापू वाघमारे,बहुजन ब्रिगेडचे माढा लोकसभा अध्यक्ष सोमनाथ शेळके,विकास बनसोडे उपस्थित होते.

माळशिरस तालुक्यातील पिंपरी येथील रेशनदुकानाच्या गैरकारभारविरुद्ध अन्नपुरवठा विभागचे महाराष्ट्र सचिव श्री परदेशी साहेब व जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर तसेच माळशिरस तहसीलदार या यांच्याकडे तक्रार केली असता त्या दुकानाच्या चौकशी संदर्भात नातेपुते मंडलाधिकारी श्री संदीप चव्हाण यांची नेमणूक केली असल्याचे समजले होते त्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी माझ्या रेग्युलर तपासणी साठी गेलो होतो,तसेच त्यांना तहसील कार्यालय येथून कुणी फोन करून तक्रार दाराचे जबाब घेण्याचे आदेश दिले होते.याचीही चौकशी करावी असे निवेदनात म्हटले आहे.

संबंधित मंडलाधिकारी यांनी पिंपरी येथील रेशन दुकानावर जाऊन रेशनदुकानदाराच्या सांगण्यावरून अनेकांच्या तक्रारी असताना एकाच व्यक्ती ची तक्रार नोंदवली आहे.

तसेच संबंधित संदीप चव्हाण मंडलाधिकारी यांचे वडील आणि रेशनदुकानचालक यांचा पती हे दोघे एकाच ठिकाणी सदाशिवनगर येथील कारखान्यात कामाला होते,तसेच या रेशनदुकान चालकाची मुले व संबंधित मंडलाधिकारी हे मित्र आहेत,त्यामुळे त्यांनी आज जाणूनबुजून अनेक तक्रारदार असताना फक्त एकाच तक्रारदार यांना बोलवून त्यांची तक्रार नोंद केली आहे.त्यामुळे संबंधित मंडलाधिकारी यांना त्वरित निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करून आजपर्यंत केलेल्या कामाची दप्तर तपासणी करावी व संबंधित दुकानदारांना पाठिशी घातल्याने या मंडलाधिकारी यांच्यावर ही आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा ही नोंद करावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom