
मा.उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्याकडून पशुखाद्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
प्रतिनिधी-सचिन रणदिवे
करोना या विषाणूने सर्व जगभरात थैमान घातले असून सर्व व्यवहार अगदी बंद पडले आहेत त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना जगणे मुश्कील झाले आहे त्यात जनावरांचा विचार कोण करतो अशा मुक्या जनावरांच्या मदतीसाठी माळशिरस तालुक्यातील माळशिरस नगरपंचायत चे मा.श्री उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्या वतीने माळशिरस नगरपंचायत वॉर्ड क्रमांक 10 मधील गरजूना पशुखाद्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे, आप्पासाहेब देशमुख, नगरपंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास वडजे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शेळके, ॲड मिलिंद कुलकर्णी, विजय देशमुख, रामभाऊ सिद,धनंजय देवकर, अशोक वाघमोडे, माळशिरस चे युवा उद्योजक सचिनआप्पा वावरे, श्रीनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे संचालक रावसाहेब देशमुख, सहकार महर्षी कारखान्याचे माजी संचालक ज्येष्ठ पत्रकार गहीनाथ वाघंबरे, कचरेवाडीचे नेते दादासाहेब जानकर, निलेश घाडगे, बाबा माने, ज्ञानेश्वर साळुंखे,कचरेवाडी चे सलीम शेख,तुकाराम गायकवाड, विक्रम वगरे,गणेश कुलकर्णी, श्रीनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गुजरे सर, उंडाळे सर उपस्थित होते.कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा बंदीचे आदेश दिल्यामुळे जनावरांनसाठी लागणारे पशुखाद्य उपलब्ध होत नसल्यामुळे तालुक्यातील जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत यासाठी पशुपालकांना व जनावरांना आधार म्हणून आप्पासाहेब देशमुख यांच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला त्यांच्या या उपक्रमामुळे पशुपालकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे त्यांच्या या उपक्रमामुळे माळशिरस तालुक्यात सह सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सोशल डिस्टेंगसिंगचा नियम पाळून संचारबंदीचेही उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती.