
माळशिरस तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिले निवेदन
माळशिरस
माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना एकरी ५० हजार अनुदान देण्यात यावे या मागणीसह १० प्रश्नांबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब,व अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना माळशिरस पंचायत समितीचे सदस्य अजय सकट यांनी ईमेलद्वारे पाठविले आहे
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे सदस्य अजय सकट यांनी निवेदन आहे या निवेदनात माळशिरस तालुक्यातील अनेक प्रश्न सोडवण्याच्या मागण्या यांत मांडल्या आहेत कोरोना व्हाईरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात हाहाकार माजलेला आहे. या मागण्या पुढीलप्रमाणे
तालुक्यातील शेतकर्यांना अवकाळी पावसामुळे मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. तसेच कोरोनामुळे अनेक फळबागा (केळी, द्राक्ष, डाळींब, कलींगड, खरबूज) तसेच अनेक पिकांचेही फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी शेतकर्यांना फळबागा व पिकांचे पंचनामे करुन शेतकर्यांना एकरी 50 हजार रुपये अनुदान / अर्थसहाय्य द्यावे, शेतकर्यांना 24 तास वीजपुरवठा द्या. सध्या होणारे भारनियमन बंद करावे,तालुक्यातील अनेक नाभिक व्यवसायाची दुकाने बंद असल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यांना दाढी,कटींग करण्यासाठी सकाळी 2 तास वेळ दुकाने उघडी ठेवण्यासाठी द्यावा,बांधकाम कामगार व मजूर यांना ५ हजार रुपयांची मदत करावी,राज्यातील गटसचिवांना समान वेतन द्यावे व त्यांना शासनाकडे वर्ग करुन घ्यावे. त्याचप्रमाणे राज्य व केंद्रसरकारने शेतकर्यांना कर्जमाफी केली असल्याने 50% पीक कर्जवसुली होत नाही. त्यामुळे तीही अट शिथील करावी, ज्या नागरिकांना रेशनकार्ड नाही, परंतु आधारकार्ड आहे. अशांना आधारकार्डवर रेशनचा शिधा मिळण्याची व्यवस्था करावी,
कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर काम करीत असलेला आरोग्य विभाग, पोलीस, ग्रामसेवक, तलाठी
कृषी सहाय्यक , अंगणवाडी सेविका अशांना शासनाकडून विमा सरंक्षण मिळावे,तालुक्यातील खाजगी हॉस्पीटल मधील डॉक्टर व कर्मचार्यांना १ कोटीपर्यंतचा विमा शासनाकडून मिळावा,
कामगार, शेतमजूर, दारिद्र्यरेषेखाली असणार्या कुटुंबाना 3 हजार रुपये मदत मिळावी,तालुक्यातील फळे व भाजीपाला विक्री करण्यासाठी बाजारपेठेत नेण्यासाठी शेतकर्याची अडवणूक होऊ
नये यासाठी त्यांना जलदगतीने पास उपलब्ध व्हावेत,दिव्यांग ,अपंगांना जीवनावश्यक वस्तू व धान्य तसेच त्यांना २ हजारांची आर्थिक मदत करावी तसेच पत्रकार जोखीम घेऊन काम करीत आहेत तरी शासनाने त्यांना विमा सरंक्षण द्यावे या निवेदनावर जि प सदस्य बाळासाहेब धाइंजे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे,
रमेशभाऊ पाटील,आंबेडकर चळवळीचे नेते विकास धाइंजे,राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने,राहुल सावंत,
शंकरराव काळे पाटील,
,तुकाराम ठवरे,नगरसेवक
मारुती देशमुख यांची स्वाक्षऱ्या आहेत तालुक्यातील हे प्रश्न दुर्लक्षीत असून सरकारने हे प्रश्न सोडवून सर्वसामान्य शेतकरी यांचे हित पहावे.असे निवेदनात म्हटले आहे हे निवेदन प्रांताधिकारी शमा पवार व तहसीलदार अभजीत पाटील यांना देण्यात आले