माळशिरस विधानसभा निवडणूक उत्तम जानकर अपक्ष लढविणार?

माळशिरस विधानसभा निवडणूक उत्तम जानकर अपक्ष लढविणार?

प्रतिनिधी—वेळापूर—उत्तम जानकर यांचा पत्ता मोहिते पाटील यांनी कट केल्याच्या बातम्या सगळीकडे पहायला मिळत आहेत,उत्तम जानकर हे माळशिरस तालुक्यातून मोठया मताधिक्याने निवडून येण्याची शक्यता आहे,मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे मोहिते पाटील यांनी आपले वजन वापरून उत्तम जानकर यांचा पत्ता कट केल्याचे दिसून येत आहे,उत्तम जानकर यांना फलटण मधून उभा राहण्यासाठी पक्षाने कळविल्याचे समजत आहे,त्या अनुषंगाने उत्तम जानकर यांनी त्यांच्या गटाच्या सर्व लोकांना 3 तारखेला बोलवून मेळावा लावला आहे, आणी त्या मेळाव्यामध्ये उत्तम जानकर कोणती घोषणा करतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

फलटण तालुक्यामध्ये उत्तम जानकर उभा राहिल्यास त्यांना फलटण मधील जनता स्वीकारेल का हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे, माळशिरस तालुका हक्काचा असताना उत्तम जानकर यांनी इतर तालुक्यात जाऊन आयात उमेदवार म्हणून निवडणूक का लढवायची अशी त्यांच्या कार्यकर्त्यानाची भावना आहे.

गेल्या वर्षी उत्तम जानकर व गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधामध्ये आरक्षणाच्या मुद्यावर भाजप सरकारला घेरले होते,आणि अनेक आरोप भाजप सरकारवरती त्या दोघांनी केले होते,त्याचा बदला म्हणून तर उत्तम जानकर यांना फलटण व गोपीचंद पडळकर यांना बारामती या इतर मतदारसंघात उभा करून त्यांचा पराभव घडवुन आणण्यासाठी व राज्यात धनगर समाजाचे नेतृत्व संपुष्टात आणण्याचे कारस्थान तर भाजप सरकारने आखले नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

उत्तम जानकर यांनी माळशिरस तालुक्यातूनच निवडणुक लढविल्यास त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करावा लागणार नाही,त्यांच्या कार्यकर्त्यांची ही हीच इच्छा असून त्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये अपक्ष निवडणूक लढवली पाहिजे असा सूर जनतेतून यायला लागला आहे,त्यामुळे मोहिते पाटील व उत्तम जानकर हे कट्टर विरोधक असल्याने मोहिते पाटील उत्तम जानकर यांना कधीच मदत करणार नसल्याची चर्चा जनतेमधून ऐकावयास मिळत आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून उत्तम जानकर कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom