बास्केट बॉल मैदान भाडेतत्त्वावर व करारावर घेवून पैसे कमावणारे कोण आहेत हे शोधणे गरजेचे – किरण साठे

किरण साठेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा धसका

अकलूज नगरपरिषदेचा अखेर खुलासा !

बास्केट बॉल मैदान भाडेतत्त्वावर व करारावर घेवून पैसे कमावणारे कोण आहेत हे शोधणे गरजेचे – किरण साठे

प्रतिनिधी : अकलूज : अकलूज मधील नगर परिषदेच्या मालकीचे असलेले क्रीडा संकुल या ठिकाणी असलेले बास्केटबॉल आणि इतर मैदान अकलूज मधील सर्व सामान्य जनतेसाठी विनाशुल्क तात्काळ खुले करण्यात यावे अशी मागणी किरण साठे यांनी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.आणि १८ ऑगस्ट रोजी क्रिडा संकुल समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

बास्केटबॉल खेळण्यासाठी येणाऱ्या सर्व सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये तसेच क्रीडा संकुल हे शासनाच्या निधीतून बांधण्यात आले आहे.त्यामुळे बास्केट बॉल आणि इतर खेळ खेळण्यासाठी येणाऱ्या जनतेला कोणत्याही प्रकारची बंदी घातली असल्यास तात्काळ ती उठवावी आणि क्रीडा संकुल ला येणाऱ्या जनतेला विना शुल्क सर्व मैदाने उपलब्ध करून द्यावीत असे निवेदनात म्हटले होते.

नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी श्री.जयसिंह खुळे यांची किरण साठे यांना दिलेल्या लेखी पत्रात सदर मैदान आकाराने मोठे असल्यामुळे देखभाल व दुरुस्ती करणे करिता होणाऱ्या खर्चासाठी सदर मैदान ग्रामपंचायत कार्यकाळामध्ये श्री विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथील बास्केटबॉल मैदान करारावर भाडेतत्त्वावर देण्यात आलेले आहे सदर मैदान सकाळी सहा ते सात व सायंकाळी पाच ते साडेसात या वेळेमध्ये पाच ते सतरा वर्षे वयोगटातील खेळाडूसाठी प्रशिक्षकांची आवश्यकता वाटल्यास फी देऊन सराव करतात तसेच सकाळी सात ते नऊ व संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेमध्ये खुल्या वयोगटातील सर्व खेळाडु करिता खुले ठेवण्यात आले आहे,असे असे म्हटले आहे.किरण साठेंनी आंदोलनाचा इशारा देताच अकलूज नगरपरिषदेचा खुलासा आल्याने अकलूजमधील खुल्या वयोगटातील खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे.

अकलूजमधील क्रीडा संकुल कुणाला करारावर व भाडेतत्त्वावर दिले आहे त्यांचा शोध घेवून कराराच्या माध्यमातून कोण पैसे कमवतायत याचा शोध अकलूजमधील जनतेने घेवून त्यांना धडा शिकविणे गरजेचे बनले आहे.असे किरण साठे म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom