
माळशिरस तालुक्यातील शेतकरी बांधवांनी16 मे हा दिवस शेतकरी सन्मान दिवस म्हणून साजरा करावा.. अजित बोरकर
शेतकऱ्यांचे दैवत माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या आदेशाने…..
प्रतिनिधी:-सचिन रणदिवे
16 मे हा दिवस किसान सन्मान दिवस म्हणजे शेतकरी सन्मान दिवस साजरा करायचे ठरवले आहे. एकूण २०लाख कोटी रुपयांचे पॅकेज सरकारने जाहीर केले त्यामध्ये 12 कोटी शेतकरी आणि 15 कोटी शेतमजुरांचा काहीच विचार केलेला दिसत नाही. जे काही मदत केल्याची ती तुटपुंज्या स्वरूपाची व तोंडाला पाने पुसली. आहेत अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने कसल्याही प्रकारचे माझ्या शेतकऱ्याला संरक्षण नाही. तरीसुद्धा हा शेतकरी 135 कोटी जनतेला त्याला खायला मिळावं म्हणून जीव धोक्यात घालून शेतीमध्ये काम करतोय खऱ्या अर्थाने सरकारने जे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामध्ये शेतमजूर व शेतकरी यांचा काहीच विचार केला नाही. जी काही मदत केली आहे ती तुटपुंजी आहे तोंडाला पाणी पुसणारी आहे. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचे संरक्षण मास्क नाही. पी.पी. कीट नाही. तरीसुद्धा हा शेतकरी १३५ कोटी जनतेला दोन टाइमचे खायला मिळावं म्हणून काम करताना दिसतो..
16 मे सकाळी नऊ वाजता प्रत्येक शेतकऱ्याने आपल्याला शेतामधून घरांमधून जिथे असेल त्या ठिकाणाहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा हातामध्ये घ्या. किंवा. हातामध्ये एखादे औजार घ्या बरोबर पाच मिनिटं !…मी योद्धा शेतकरी..! कोरोना योद्धा शेतकरी….! तुम्हाला गर्वाने सांगतो मी शेतकरी आहे…! अशा प्रकारचा हा कार्यक्रम देशभर राबवायचे ठरवले आहे म्हणून माझ्या माळशिरस तालुक्यातील शेतकरी बांधव व शेतमजूर यांनी उद्या हा दिवस शेतकरी सन्मान दिवस म्हणून साजरा करावा असे अजित बोरकर यांनी आव्हान केले आहे