माळशिरस तालुक्यातील कोरोनाबाधित गावामध्ये लॉकडाउन करण्याची किरण साठे यांची मागणी
वार्ताहार–अकलूज-उपविभागीयअधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी निवेदन देऊन माळशिरस तालुक्यातील कोरोनाबाधित गावामध्ये त्वरित लॉकडाउन लागू करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा अशी मागणी केली आहे,सदर मागणीचे निवेदन ए स कारंडे यांनी स्वीकारले,यावेळी बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,मनसेचे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे इत्यादी उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यामध्ये एकूण ७६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे,त्यामुळे या सर्व कोरोनाबाधित रुग्णांची साखळी मोडीत काढण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माळशिरस तालुक्यातील ज्या गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत त्या संपूर्ण गावातील जनतेची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात यावी व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत चर्चा करावी व आपल्या अनुभवानुसार लॉक डाउन करून कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसेच आपण हा निर्णय त्वरित घेऊन जनतेचे हित जोपसावे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी निवेदनात म्हटले आहे.सदर निवेदनाच्या प्रति सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे व जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर यांना पाठविण्यात आल्या आहेत.
