माळखांबी ग्रामपंचायतीमधील लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी होणार; गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मविसेचे आमरण उपोषण मागे

माळशिरस: मौजे माळखांबी ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा शासकीय निधी लाटल्याचा आणि प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत या मागणीसाठी ५ ऑक्टोबरपासून माळखांबी ग्रामपंचायत समोर विधानसभा अध्यक्ष बिभीषण साठे, सतीश साठे, सागर सरतापे, महेश साठे आणि ऋषिकेश साठे यांनी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीचे प्रशासक, तालुका कृषी अधिकारी आणि विस्तार अधिकारी श्री. पवार यांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना लेखी पत्र पाठवून, प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पुढील दहा दिवसांत सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट लेखी आश्वासन दिले. गटविकास अधिकाऱ्यांकडून निश्चित कालमर्यादेत चौकशी सुरू करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर, प्रशासनाला सकारात्मक सहकार्य करत बिभीषण साठे आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी आपले बेमुदत आमरण उपोषण मागे घेतले व आंदोलनाची सांगता केली. ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या तक्रारीनुसार, शासकीय ऑनलाईन प्रणालीवर उपलब्ध अधिकृत नोंदीनुसार विविध विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा शासकीय निधी कंत्राटदार, सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संगनमताने हडप करण्यात आला आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी यातील बहुतांश कामे अस्तित्वातच नाहीत, किंवा जुन्याच कामांवर नवीन रंगरंगोटी करण्यात आली आहे; तसेच साहित्य खरेदी व करांच्या खोट्या आणि बोगस पावत्या लावून हा शासकीय निधी लाटण्यात आल्याचा अत्यंत गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने आता १० दिवसांत चौकशी सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले असल्याने, या चौकशीतून काय सत्य समोर येते आणि दोषींवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom