मातंग संघर्ष समितीचे सदस्य समाजाच्या मागण्यासाठी थेट मंत्रालयात दाखल..
समाजाच्या वतीने क्रांतिकारक संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भोसले यांचा सत्कार
प्रतिनिधी : अकलूज : आझाद मैदान मुंबई येथे २२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जातीत अ,ब,क,ड वर्गवारी करून आरक्षण मिळावे,बार्टीच्या धरतीवर आर्टीची निर्मिती करण्यात यावी.या मागणीसाठी जवाब दोन आंदोलन करण्यात आले.सदर आंदोलनाला मातंग संघर्ष समितीच्या वतीने क्रांतिकारक संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भोसले यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
तसेच मंत्रालयात जाऊन विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे भेटून,क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने लागू केलेल्या शिफारशींचे स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित कराव्यात. या मागण्या आगामी अधिवेशनात मांडाव्यात म्हणून. मातंग संघर्ष समितीच्या वतीने क्रांतिकारक संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भोसले यांनी निवेदन देवून सविस्तर चर्चा केली.यावेळी क्रांतिकारक संघर्ष सेनेचे राज्य कार्य अध्यक्ष विजयकुमार कदम साहेब,अमोल भोसले,इंदापूर तालुका अध्यक्ष ,अतुल भोसले इंदापूर तालुका उपअध्यक्ष,पोपट दळवी माळशिरस तालुका संघटक ,अदि कार्य करते उपस्थित होते.
गणेश भोसले यांनी मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी थेट मंत्रालयात धाव घेतल्याने मातंग संघर्ष समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य,अजिनाथ खंडागळे,बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे,भाजपचे अजित साठे,सोमनाथ लोखंडे,वैभव लोखंडे,सूरज मोहिते,आदित्य काकडे,उपस्थित होते.
