पंढरपूर तालुक्यातील एका नेत्याचे कमिशन साठी माळशिरस तालुक्यातील कारखान्याकडे लक्ष

पंढरपूर तालुक्यातील एका नेत्याचे कमिशन साठी माळशिरस तालुक्यातील कारखान्याकडे लक्ष

प्रतिनिधी: पिलीव: माळशिरस तालुक्यातील पिलीव परिसरातील कारखान्याला उस्मानाबाद जिल्ह्यातील एका नामांकित बँकेकडून कर्ज उपलब्ध करून पाहिजे आहे,त्यामुळे त्या बँकेचे चेअरमन संबंधित कारखाण्याच्या सांगता संभारंभासाठी गेले असताना पंढरपूर तालुक्यातील एका पक्षाचा राज्य पातळीवर असलेला नेता त्याठिकाणी न बोलविता हजर राहिला होता.

संबंधित कारखाण्याचा सांगता समारंभ हा माळशिरस तालुक्यातील नामांकित व्यक्तीच्या मुलाच्या हातून करण्यात आला होता मात्र,पंढरपूर तालुक्यातील एका राज्य पातळीवर असलेल्या नेत्याने हा कार्यक्रम स्वतःच्या हस्ते झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.हा पंढरपूर तालुक्यातील नेता प्रसिद्धी साठी मोठ्या प्रमाणात हापापल्याला दिसतो आहे.कारखाण्याच्या चेअरमन ला उस्मानाबाद जिल्ह्यातील नामांकित बँकेकडून कर्ज काढायचे आहे असे समजताच हा उस्मानाबाद जिल्ह्यातील नामांकित बँकेचा स्वयंघोषित मालक त्या कारखाण्याच्या चेअरमन कडे हेलपाटे मारायला लागला आहे.

माळशिरस तालुक्यातील साखर कारखाना असलेल्या चेअरमनने बोलविले नसताना स्वतःहून तिथे येणे ही शरमेची गोष्ट आहे,त्या चेअरमन ला कर्ज काढण्यासाठी मदत करतो मी तुम्हाला कर्ज मिळवून देतो माझे कमिशन मला द्यावे लागेल असे पंढरपूर तालुक्यातील एका पक्षाचा राज्य पातळीवर असलेला नेता म्हणत असल्याची चर्चा माळशिरस तालुक्यातील कारखाण्याच्या कामगारांमध्ये होताना दिसत आहे,त्यामुळे हा पंढरपूर तालुक्यातील राज्य पातळीवर असलेला नेता हा उस्मानाबाद जिल्ह्यातील नामांकित बँकेचा स्वयंघोषित मालक नसून तो या बँकेचा एजंट असल्याची चर्चा पंढरपूर तालुक्यात होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom