
मांडवे गावातील रेशन दुकानदार बहुजन ब्रिगेडचे दत्ता कर्चे यांच्या दणक्याने झाला सरळ
प्रतिनिधी–सदाशिवनगर—मौजे मांडवे ता.माळशिरस येथील रेशन दुकानांमध्ये शासनाच्या नियमानुसार रेशनकार्ड धारकांना माल वितरित होत नसल्याची तक्रार बहुजन ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रमुख संघटक दत्ता कर्चे व संघटनेकडे मांडवे गावातील रेशनकार्ड धारकांनी केली होती,त्याची शहानिशा करण्यासाठी दत्ता कर्चे यांनी शासनाने दिलेल्या वेबसाईटवर त्या तक्रार देणाऱ्या व्यक्तीच्या आर सी नंबर टाकून पाहिल्यानंतर त्या व्यक्तीना शासनाच्या नियमानुसार मला दिला जात नसल्याचे दिसून आले, त्या विषयावर बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे व महाराष्ट्र राज्याचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी दिनांक १५ एप्रिल रोजी माळशिरस तालुक्याचे तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन या प्रकाराकडे लक्ष वेधले,बहुजन ब्रिगेडच्या तक्रारी निवेदनाची दखल घेऊन पुरवठा अधिकारी यांनी मांडवे गावातील रेशन दुकानाला भेट देऊन दत्ता कर्चे यांच्या तक्रारी संदर्भात त्यांच्यासमोर चौकशी केली व तक्रारीला अनुसरून पुरवठा अधिकारी यांनी रेशन दुकानदार यांना सूचना दिल्या.

मांडवे गावामध्ये आजपर्यंत कोणत्याही पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी या विषयावर आवाज उठवला नव्हता.मात्र मांडवे गावामध्ये हा सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न दत्ता कर्चे यांनी उचलून धरला आणि तो मार्गी लावल्याने सर्वसामान्य जनतेला दत्ता कर्चे यांच्यामुळे त्यांच्या हक्काचा माल मिळण्यास सुरुवात झाल्याने दत्ता कर्चे यांचे सर्वसामान्य व गोरगरीब रेशनकार्ड धारक यांनी मनापासून आभार मानले आहेत.आता प्रत्येक रेशनकार्ड धारकांचा आर सी नंबर तपासून माल दिला जात असल्याने व या माल वाटपाच्या उदघाटन कार्यक्रमाला दत्ता कर्चे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते,मांडवे गावातील रेशन दुकानदार बहुजन ब्रिगेडचे दत्ता कर्चे यांच्या दणक्याने सरळ झाल्याची चर्चा संपूर्ण मांडवे गावांमध्ये व माळशिरस तालुक्यातील जनतेतून होताना दिसत आहे.या वेळी बहुजन ब्रिगेड चे प्रमुख संघटक दत्ता कर्चे, तलाठी प्रवीण उदगावे,माजी सरपंच तानाजी पालवे, पोलिस पाटील नितीन सोनट्टके,ज्ञानदेव पालवे,दुकानदार नारायन पाठक, गायकवाड, दत्ता ठोबळे इत्यादी उपस्थित होते.