मळोली परिसरात कॅनॉलच्या पाण्याचे नियोजन कोलमडले.

मळोली परिसरात कॅनॉलच्या पाण्याचे नियोजन कोलमडले.

प्रतिनिधी-महेश घाडगे

मळोली,(ता. माळशिरस) येथे नीरा उजवा कालव्याच्या अंतर्गत येणाऱ्या डी 4 या वितरीकेस कमी दाबाने पाणी शेतीस सोडल्याने या उपफाट्यावर अवलंबून असणारी पिके ,ऊस,मका,कडवळ, कोबी,कलिंगड,जळून खाक होण्याच्या मार्गावर असून पूर्णपणे पिके जळून गेल्यानंतर प्रत्येकवर्षी होणारी पाण्याची बिकट अवस्था या वेळी पाणी वापर संस्था निर्माण होऊन सुद्धा थांबली नाही हे विशेष
डी 4 या नीरा उजव्या कालव्याच्या उपफाट्यास पाणी 27 मार्च रोजी सोडण्यात आले असून आज पर्यंत हे पाणी पुरेश्या दाबाने न सोडल्याने शेतकऱ्यांची पिके जळण्याची नामुष्की प्रत्येकवर्षी प्रमाणे या ही वर्षी पाटबंधारे विभागास टाळता आली नाही या उपफाट्यावर , मळोली,तांदुळवाडी,
शेंडेचिंच,धानोरे, तोंडले,बोंडले व दसुरचा काही भाग सिंचनाखाली येतो गेली सुमारे वीस ते पंचवीस वरश्यापासून या उपफाट्यास उन्हाळी पाळी हमखास कमी दाबाने सोडून या फाट्यावरती असणाऱ्या शेतकरी वर्गाची पिके नाहक नियोजनाअभावी जळाली जातात अनेक ठिकाणी तक्रार व आपली कैफियत मांडूनसुद्धा या शेतकरी वर्गाची कोणीही दखल घेत नसून केवळ पंचवार्षिक असल्यापुरते लोकप्रतिनिधी आपल्या छातीचा कोट करून पाण्याचा प्रश्न या वेळेला हमखास सोडवू असं सांगून मतदान करण्याचं आवाहन करतात
या उपफाट्यावर चार ते पाच पाणी वापर संस्था असून या संस्थांच्या माध्यमातुन शेतकरी वर्गाचे पाणी प्रश्न मिटतील अशी अपेक्षा होती मात्र ,पाटबंधारे विभाग व पाणी वापर संस्था यांचं नियोजन चुकीचं झाल्याने अनेक शेतकरी वर्गाची जीवापाड जपलेली पिके आज अक्षरशः जळून गेलेली आहेत, या बाबत या उपफाट्यास पाणी पूर्ण दाबाने सोडण्यासाठी पाणी वापर संस्था चे चेअरमन श्री राजेंद्र जाधव पाटील यांनी अनेकवेळा आधिकारी वर्गाशी चर्चा केली परंतु सोडू,प्रयत्न चालू आहेत अश्या पद्धतीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचे प्रकार चालू आहेत,या अश्या चुकीच्या पद्धतीने पाणी वेळेत मिळत नसल्याने अनेक शेतकरी पाण्याचा पास न टाकणे पसंत करत असून भविष्यात या भागातील शेती व शेतकरी यांना वेगळा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे,आज पंधरा दिवसापूर्वी आलेलं हे कॅनॉलच पाणी अजूनही निम्या भागात पोहचले नसून रात्री अपरात्री होणारी पाण्याची चोरी जर रोखली गेली नाही तर या पाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल हे निश्चित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom