महेश शिंदे यांच्या उपोषणाला उपविभागीय अधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद

महेश शिंदे यांच्या उपोषणाला उपविभागीय अधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद

अकलूज : प्रतिनिधी: माळशिरस तालुक्यातील जनतेला हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड राखीव ठेवण्याच्या मागणीसाठी मैत्री फाउंडेशन चे अध्यक्ष व जनसेवा संघटनेचे सदस्य महेश शिंदे यांनी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते.उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे,बहुजन मुक्ती पार्टीचे काकासाहेब जाधव,जनसेवा संघटनेचे रघुनाथ साठे,नितीन ढावरे,प्रहार संघटनेचे अविनाश सोनवणे, भारतीय जनता पक्षाचे अक्षय वाईकर,वाघच ग्रुप चे सचिन रास्ते, उपस्थित होते.

सदर उपोषणाची तात्काळ दखल घेऊन उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्याकडून लेखी पत्र देऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेकामी प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठी बेड मॅनेजमेंट वार रूमची स्थापना केली असून त्यासाठी माळशिरस तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, सदरचे अधिकारी व कर्मचारी हे माळशिरस तालुक्यात कोविड-१९ बाधित रुग्णांना योग्य वेळी बेड उपलब्ध करून देणेकामी कार्यरत आहेत असे कळविले आहे,त्यामुळे माळशिरस तालुक्यातील जनतेसाठी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत कोविड -१९ रुग्णांना बेड उपलब्ध करून दिले जात असल्याने महेश शिंदे यांच्या उपोषणाला अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने महेश शिंदे यांनी उपोषण सोडले आहे.महेश शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेच्या विषयावर उपोषण केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom