कोविड काळातील कर्मचाऱ्यांना भरतीमध्ये प्राधान्य देण्याची बहुजन ब्रिगेडची मागणी

कोविड काळातील कर्मचाऱ्यांना भरतीमध्ये प्राधान्य देण्याची बहुजन ब्रिगेडची मागणी

प्रतिनिधी : पुणे : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी निवेदन पाठवून कोविड काळामध्ये ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम केले त्यांना प्रामुख्याने नियुक्ती देण्याची मागणी केली आहे.

आरोग्य विभागांमध्ये कर्मचारी भरती होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोणा च्या पहिल्या लाटेत ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिक वर आपली सेवा बजावली तुटपुंजा पगार मध्ये त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित रुग्णांची सेवा करण्यासाठी अहोरात्र झटण्याचे काम केले व राज्य सरकारवर आलेले कोरोणाचे संकट योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी नियोजनबद्ध काम करून कोरोणाची पहिली लाट थोपविण्यासाठी आपले योगदान दिले त्या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती करण्याची योजना जाहीर केली असल्याचे समजले असून या योजनेमध्ये पहिल्या लाटेमध्ये ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिक वर काम केलं त्या सर्व कर्मचाऱ्यांना प्राधान्याने बोलावून घेऊन किंवा त्या सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वे आपल्या आरोग्य यंत्रणेमार्फत करून त्यांना प्राधान्याने तात्काळ आपल्या आरोग्य सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी प्राधान्य द्यावे असे बहुजन ब्रिगेड संघटनेच्या निवेदनात नमूद केले आहे.

तसेच इथून पुढे चालू असलेल्या दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा त्यांनी केलेल्या कामाच्या अनुभवानुसार आपल्याला दुसरी लाट थोपविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत या आरोग्य कर्मचाऱ्याकडून होणार आहे त्यामुळे त्यांना तात्काळ नियुक्तीपत्र देऊन त्यांना आरोग्य सेवेमध्ये समाविष्ट करावे व त्या कोविंड योद्ध्यानचा सन्मान करावा अशी मागणी बहुजन ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,व आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom