
महिलांचे खाजगी कंपन्याचे फायनान्स माफ करा- चंदु खिलारे
प्रतिनिधी सचिन रणदिवे
सध्या जगावर व देशावर कोरोना (कोविड 19) चे संकट आल्या मुळे. देशात व राज्यत देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी. यांनी सर्वत्र लाँकडाऊन जाहिर केले आहे.व अशा परस्थितीत महिलांनी अडचणीच्या काळात बँके कडून कर्ज न घेता. सहज आणि जलद कमी वेळात घर पोहोच कर्ज पुरवठा करणाऱ्या. खाजगी फायनान्स कंपन्या कडून महिलांनी कर्ज घेतले आहे. व सर्वत्र लाँकडाऊन असल्यामुळे महिलांच्या हाताला काम नसल्याने.त्यांच्या कुटुंबांची उपासमार होत आहे .अशा काळात खाजगी फायनान्स कंपनी वाले फोन करून. महिलांना हप्ते भरण्यासाठी त्रास देत आहेत .व देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी आणि राज्यचे मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे साहेब. यांनी मोठ मोठे उद्योगपती मेहुल चौक्सीया, निरव मोदी व अशा कर्ज बुडव्या पंन्नास कर्ज बुडव्या लोकांचा यात समावेश आहे. जर महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार यांचे ६८ हजार ६०७ कोटिंचे कर्ज माफ करू शकते. तर कामगार, महिला,शेतकरी यांनी आठवडी व मासिक हप्त्यांचे खाजगी कंपनी कडून घेतलेले कर्ज . महिला, शेतकरी, कामगार यांच्या हाताला काम नाही तरी .राज्य सरकारने हे कर्ज तत्काळ माफ करण्याची मागणी. माणूस जिवाभावाचा सामाजिक संस्थचे संस्थापक अध्यक्ष.श्री. चंदु खिलारे(दहिगाव ) यांनी केली आहे या बाबत मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांना पत्रव्दारे कळवणार असल्याचेही सांगितले आहे