महाराष्ट्र विकास सेनेची सांगोला तालुक्यात बैठक
गायगव्हान ग्रामपंचायतचे सदस्य समाधान कांबळे यांची तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी निवड
प्रतिनिधी : सांगोला : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण साठे यांच्या अध्यक्षतेखाली गायगव्हाण तालुका सांगोला येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाची बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये किरण साठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले त्याचबरोबर सांगोला तालुका प्रसिद्धीप्रमुखपदी ग्रामपंचायत सदस्य गायगव्हाण समाधान कांबळे यांची निवड करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य समाधान कांबळे यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नूतन सांगोला तालुका प्रसिद्धीप्रमुख यांनी पक्षप्रमुख किरणजी साठे यांच्या समवेत लवकरच सांगोला तालुक्याचा दौरा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र विकास सेना समन्वयक महाराष्ट्र राज्य अजित साठे,सांगोला तालुका संपर्कप्रमुख प्रवीण सावंत,नवनाथ कांबळे ,प्रगतशील बागायतदार संजय टकले सुनील टकले अजिंक्यतारा ग्रुपचे सर्वेसर्वा नवनाथ पाटील टकले,चेअरमन सुनील कांबळे धनाजी कांबळे,शंकर साठे,सागर कांबळे,विलास कांबळे,अनिल कांबळे,दत्ता रणदिवे सचिन कांबळे,अरुण कांबळे,राहुल गायकवाड,विक्रम मस्के,महादेव आडगळे,आनंद खिलारे,नवनाथ तानाजी कांबळे,मायाप्प गायकवाड,विजय मस्के,सागर मस्के तसेच गायगव्हाण व महूद भागातील ग्रामस्थ हजर होते.

