इंदापूर मनसेला जोरदार धक्का !

इंदापूर मनसेला जोरदार धक्का !

महाराष्ट्र विकास सेनेत अविराज माने यांनी केला प्रवेश

प्रतिनिधी : इंदापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष व राज ठाकरे यांचे कट्टर कार्यकर्ते अविराज माने यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला सोडचिट्टी दिली आहे. त्यांनी महाराष्ट्र विकास सेना पक्षामध्ये पक्षप्रमुख किरण साठे यांच्या उपस्थितीमध्ये अकलूज येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर मिळत प्रवेश केला.यावेळी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे नेता दत्ता कर्चे,आबा लवटे,डॉ विकास लोखंडे,समाधान कांबळे,बापूराव बुधावले,नानासाहेब पवार,किसन खिलारे,सचिन खिलारे उपस्थित होते.

अविराज माने नेहमीच इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत होते. पक्षांमध्ये सक्रियपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कदर इंदापूर तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षांमध्ये केली जात नसल्याची खंत त्यांच्या मनात होती.पक्षामध्ये असलेले गट तट या सर्व गोष्टीला कंटाळून महाराष्ट्र विकास सेना पक्षामध्ये प्रवेश केला असल्याचे अविराज माने यांनी सांगितले.अविराज माने यांनी महाराष्ट्र विकास सेना पक्षांमध्ये प्रवेश केल्याने महाराष्ट्र विकास सेना पक्षाने इंदापूर मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जोरदार धक्का दिला असल्याची चर्चा इंदापूर तालुक्यातील जनतेमध्ये चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom