महसूल,पोलीस,आरोग्य विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस कडून अभिनंदन

महसूल,पोलीस,आरोग्य विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस कडून अभिनंदन

प्रतिनिधी–जगासह आपल्या देशातही कोरोनाने हैदोस घातलेला असताना महाराष्ट्र सरकाने ज्या सूचना केल्या किंवा अटी,नियम,बंधनकारक केले त्याचे काटेकोरपणे माळशिरस तालुक्यातील महसूल विभाग,आरोग्य विभाग,पोलीस खाते यांनी अंमलबजावणी केली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर व जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना निवेदन देऊन अभिनंदन केले आहे.
सदर अभिनंदनपर निवेदन उपविभागीय अधिकारी शमा पवार व माळशिरस तालुक्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी स्वीकारले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर, जिल्हा सरचिटणीस किरण साठे, बहुजन ब्रिगेडचे माढा लोकसभा अध्यक्ष सोमनाथ शेळके,मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश शिंदे,बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,प्रवीण निकम,ऋषी जाधव,सचिन खिलारे इत्यादी उपस्थित होते.

माळशिरस तालुक्यातील जनतेनेही या सर्व यंत्रणेला लॉक डाउन च्या तिसऱ्या टप्प्यापर्यत सहकार्य केले आहे.
उत्तम रित्या या तिन्ही विभागाने अतिशय सुंदर काम करून आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नाही,या तिन्ही खात्यातील संबंधित अधिकारी,कर्मचारी यांनी आपला जीव धोक्यात घालून कोणत्याही व्यक्तीबरोबर भेदभाव न करता सर्वांना एकच न्याय देण्याचे काम केले आहे असेही निवेदनात नमूद केले आहे.

माळशिरस तालुक्यातील जनतेच्या हिताच्या दुरुष्टीकोनातून योग्य असे नियोजन केले असल्याने त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे,ज्या उपाययोजना या तिन्ही खात्याच्या प्रमुख अधिकारी यांनी लॉक डाउन च्या तीन टप्प्यापर्यंत राबविल्या त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व अभिनंदन त्याच पद्धतीने आता लॉक डाउन चा चौथा टप्पा चालू झाला असून ज्या प्रमाणे मागचे तीन टप्पे माळशिरस तालुक्यातील जनतेने प्रशासनाला सहकार्य केले त्याचप्रमाणे चौथ्या टप्प्यामध्ये ही शासनाच्या नियमाचे व सूचनांचे पालन करून माळशिरस तालुक्यातील महसूल,पोलीस,आरोग्य विभागातील अधिकारी यांना सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom