भांबुर्डी येथील रस्त्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी ग्रामपंचायत सदस्य विष्णू आण्णा वाघमोडे

भांबुर्डी येथील रस्त्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी ग्रामपंचायत सदस्य विष्णू आण्णा वाघमोडे

प्रतिनिधी सचिन रणदिवे

मौजे भांबुर्डी ग्रामपंचायत हद्दीतील 14 व्या वित्त आयोगातील शेंडगे वस्ती ते साळुंखे वस्ती दरम्यान जाणारा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे खडी टाकून वरती शाडू मातीचा थर टाकून काम पूर्ण केले आहे रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे पडलेले आहेत खडी उघडी दिसत आहे या रस्त्याचे काम शासनाच्या नियमाप्रमाणे होत नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करून सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे निकृष्ट दर्जाचे काम निदर्शनास आणून देखील जाणून-बुजून चौकशीसाठी टाळाटाळ केली जाते तरी आपण वरिष्ठ स्तरावर कामाचा दर्जा तपासून कॉन्ट्रॅक्टर, शासकीय अधिकारी,ग्रामसेवक, शाखा अभियंता, व संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी संबंधित कामाची चौकशी होईपर्यंत बिल थांबवण्यात यावेत अशा आशयाचे पत्र भांबुर्डी ग्रामपंचायत सदस्य विष्णू आण्णा वाघमोडे यांनी दिनांक 15/05/2020 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, उपविभागीय आयुक्त महसूल शाखा विभाग पुणे, राष्ट्रीय अपराध जाॅच बिरो मुख्य कार्यालय(उ.प्र) यांना ई-मेल द्वारे पाठवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom