बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर मध्ये संपर्क कार्यालय उदघाटन व मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान
प्रतिनिधी : पंढरपूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे शिवसेना,युवा सेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना समन्वयक शिवाजी सावंत,यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमाध्ये अन्नदान करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे,माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ अमभंगराव,ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा प्रमुख जयवंत माने,माजी जिल्हा उपजिल्हा प्रमुख महेश साठे,जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे,संजय घोडके, गणेश घोडके,सिध्दनाथ कोरे,समाधान पैलवान,चरण चौरे,चैतन्य भोसले उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना जिल्हा उपप्रमुख आकाश माने यांनी केले होते.

