बहुजन ब्रिगेडच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी स्वप्नील गायकवाड
नातेपुते–प्रतिनिधी –बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष
किरण साठे यांच्या उपस्थितीत व बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या सूचनेनुसार बहुजन युवा ब्रिगेडच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी शणोली ता दक्षिण कराड येथील स्वप्नील गायकवाड यांची निवड अकलूज मध्ये करण्यात आली,स्वप्नील गायकवाड यांना दक्षिण कराड,उत्तर कराड,पाटण या तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे,सदर निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,युवा अध्यक्ष उदय कांबळे उपस्थित होते.
बहुजन समाजामध्ये एकोपा निर्माण करून बहुजन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघटनेची ध्येय धोरणे पोहचविण्यासाठी प्रयत्न करून समाजातील महिला,विद्यार्थी,
सुशिक्षित बेरोजगार,शेतकरी यांच्या प्रश्नांला वाचा फोडण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करून त्याला प्रसिद्धी द्यावी असे नियुक्ती पत्रामध्ये नमूद केले आहे.
