बहुजन ब्रिगेडच्या माढा लोकसभा अध्यक्षपदी शेळके तर जिल्हा सरचिटणीस पदी ननवरे यांची निवड
प्रतिनिधी—–कोळेगाव–बहुजन ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र

उपाध्यक्ष आनंद एकतपुरे यांनी अकलूज येथील सोमनाथ शेळके यांची माढा लोकसभा अध्यक्षपदी तर सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी कोळेगाव ता माळशिरस येथील नवनाथ ननवरे पदी निवड केली.

सदर निवडीचे पत्र अकलूजमध्ये देण्यात आले,नवनाथ ननवरे व सोमनाथ शेळके यांनी अनेक पक्षामध्ये व संघटनेमध्ये काम केले असल्याने आणि संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे,महिलांचे,प्रश्न सोडवून त्याचप्रमाणे बहुजन समाजामध्ये एकी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा यासाठी सोमनाथ शेळके याना माढा लोकसभा व नवनाथ ननवरे यांना सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली असल्याचे बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आनंद एकतपुरे यांनी सांगितले.

यावेळी बहुजन ब्रिगेडचे माढा लोकसभा अध्यक्ष सोमनाथ शेळके,सोलापूर जिल्हा सरचिटणीस नवनाथ ननवरे, जिल्हा कार्यध्यक्ष सचिन मोरे,जिल्हा सचिव ऋषीपाल बनसोडे,माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील,अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,युवा शहराध्यक्ष उदय कांबळे,साहिल अडगळे,जावेद शेख,आदित्य काकडे,सागर कोळी,मोदीन शेख,अमीर शेख,पप्पू क्षीरसागर,फिरोज शेख,रफिक मुलाणी इत्यादी उपस्थित होते.