बहुजन ब्रिगेडच्या माढा तालुका उपाध्यक्ष पदी पप्पू गायकवाड यांची निवड
प्रतिनिधी—माढा— बहुजन ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या आदेशानुसार व बहुजन ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा संघटक नानासाहेब खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन ब्रिगेडच्या माढा तालुका उपाध्यक्ष पदी घोटी येथील पप्पू गायकवाड यांची निवड बहुजन ब्रिगेड संघटनेचे सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष राजेश खरे यांनी पंढरपूर येथील विश्रामगृह येथे निवडीचे पत्र देऊन जाहीर केली.
सदर निवडी प्रसंगी जिल्हाउपध्यक्ष राजेश खरे यांनी नूतन पदाधिकारी यांना संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची,शेतकरी,विद्यार्थी यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आंदोलने करून आवाज उठविण्यासाठी मार्गदर्शन करून बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला संघटनेमध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन केले, यावेळी संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.