बहुजन ब्रिगेडच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी समाधान कांबळे यांची निवड
प्रतिनिधी–करकंब–बहुजन ब्रिगेड संघटनेच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी मौजे-सांगवी ता.पंढरपूर येथील समाधान कांबळे यांची निवड बहुजन युवा ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजेश खरे यांनी केली.सदर निवडीचे पत्र बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या हस्ते अकलूजमध्ये देण्यात आले.यावेळी बहुजन युवा ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजेश खरे,पंढरपूर तालुका कार्यध्यक्ष गणेश नवगिरे,पोलीस पाटील नारायण जाधव,अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,राहुल भोसले,दादा लोखंडे,धैर्यशील कांबळे,सोमनाथ पावर,साई अडगळे इत्यादि उपस्थित होते.
बहुजन समाजामध्ये एकी प्रस्थापित करून समाजातील प्रत्येक घटकाला बहुजन ब्रिगेडच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करून
शोषित,पीडित,व शेतकरी,विद्यार्थी,सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभा करून संघटनेचे ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्य करावे असे निवडीची पत्रामध्ये नमूद केले आहे.

