बहुजन ब्रिगेडच्या पंढरपूर युवक तालुका अध्यक्षपदी विशाल वाघमारे यांची निवड .
प्रतिनिधी पंढरपूर
बहुजन ब्रिगेड संस्थापक अध्यक्षचे व राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस किरण तानाजी साठे यांच्या आदेशानुसार बहुजन ब्रिगेडच्या पंढरपूर तालुका युवक अध्यक्षपदी गुरसाळे गावचे श्री विशाल लक्ष्मण वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आले आहे सदर निवडीचे पत्र सोलापूर जिल्ह्याचे संघटक माननीय श्री नानासाहेब सुखदेव खंडाळे व सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजेश खरे तसेच पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष गणेश नवगिरे यांच्या हस्ते देण्यात आले . या वेळीस्वाभिमानी रिपब्लकन पक्ष सोलापूर जिल्हाध्यक्ष आनंद लोंढे…पंचशील तरुण मंडळ गुरसाळे चे अध्यक्ष अशोक गवळी संदीप वाघमारे ,श्रीराम वाघमारे गणेश वाघमारे अ मरदिप लोखंडे.निलेश वाघमारे,हरिभाऊ वाघमारे इत्यादी उपस्थित होते.
संघटनेच्या माध्यमातून सामान्य माणसाचे शेतकरी वर्ग विद्यार्थी तसेच बहुजन वर्ग दलित समाज यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चा प्रयत्न करावा. व बहुजन समाज एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. आपल्या हातून संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जावा अशी अपेक्षा असल्याचे निवडीच्या पत्रामध्ये नमूद केले आहे.
