फुरसुंगी उरुळी देवाची एमजीपी पाणी योजनेसाठी भाजपाने दिला आंदोलनाचा इशारा

फुरसुंगी उरुळी देवाची एमजीपी पाणी योजनेसाठी भाजपाने दिला आंदोलनाचा इशारा

फुरसुंगी प्रतिनिधी – फुरसुंगी उरुळी देवाची या कचरा डेपो बाधित गावांसाठी शासनाची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना गेले अनेक दिवस झाले रखडलेली आहे या योजनेचे काम संपूर्णपणे थांबलेले आहे या मुळे नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे यासंदर्भात भाजपा मध्य हवेलीचे तालुकाध्यक्ष धनंजय कामठे व भाजपा उपाध्यक्ष संतोष हरपळे हे गेल्या अनेक दिवसापासून या पाणी योजनेच्या कामाचा पाठपुरावा करत आहेत यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देऊन व आंदोलन करून कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला नाही याच कारणाने 6/8/21रोजी पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख साहेब यांना या संदर्भातील निवेदन देऊन येत्या दहा दिवसांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे काम चालू झाले नाही तर 17/8/21 वार मंगळवार रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उरळी देवाची व फुरसुंगी परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे यावेळी मध्य हवेली भाजपा तालुका अध्यक्ष धनंजय कामठे व उपाध्यक्ष संतोष हरपळे यांनी निवेदनामध्ये इशारा दिलेला आहे

या वेळी भाजपा मध्य हवेली सरचिटणीस पांडूरंग रोडे, बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दत्ता कर्चे, स्वयंभू फाऊंडेशन चे सचिव प्रथमेश जगताप उपस्थित होते. सदर निवेदनामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी सदर कामासाठी कोणत्याही प्रकारचे काम करत नसल्याने अजून ही काम अपूर्णच असल्याचे निदर्शनास येत आहे फुरसुंगी उरुळी देवाची हा परिसर कचरा डेपो बाधित असल्याने या परिसरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत आहे. सदर अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेटून ही कोणत्याही प्रकारची हालचाल केलेली दिसत नाही असे या वेळी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom