
प्रांत अधिकारी शमा पवार यांनी हनुमान गणेशोत्सव मंडळ यांच्या पाठीवरती दिली आपुलकीची थाप
प्रतिनिधी सचिन रणदिवे
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर नातेपुते शहरातील श्री हनुमान गणेशोत्सव मंडळ, मंडईचा राजा नातेपुते. यांनी लॉकडाउन च्या काळात गरजू लोकांना अन्नदान केले, लॉकडाउन च्या काळात माणसा पासून माणसं दूर असताना आमच्या मंडळांनी माणुसकीच्या नात्याने सर्वांना एकत्र आणले आणि हे सर्व शक्य झाले नातेपुते येथील नागरिकांनी दाखवलेल्या सामाजिक जबाबदारी मुळे मंडळाला खूप लोकांचे सहकार्य मिळाले तसेच कामाचे कौतुक ही झाले अन्नदान केलेल्या लोकांचे आशीर्वाद मिळाले माळशिरस तालुक्यातील प्रांत मॅडम.शमा पवार (उपविभागीय दंडाधिकारी-माळशिरस विभाग अकलूज) यांची स्तुत्यास्पद व कौतुकास्पद आपुलकीची थाप आमच्या पाठिशी मीळाली आमच्या कार्याची ही एक पोहचपवती मिळाली. आणि त्यांच्या कडून आमच्या कामाची दखल म्हणून सन्मानपत्र मिळाले आणि आम्ही राबविलेल्या सामाजिक उपक्रमा बद्दल त्यांच्याकडून आमच्या मंडळाचा गौरव करण्यात आला.
आम्ही आमची ही समाजा बद्दलची जबाबदारी अशीच कायमस्वरूपी चालू ठेऊ आणी समाजातील गरजू जनतेची आमच्या मंडळाच्या वतीने नेहमी अशीच सेवा करत राहू.