
महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन…
प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने मंत्रालयात निवेदन देवून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून पूरपरिस्थिती व मुसळधार पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांना ५० हजार रुपये,शेळी मेंढीना १० हजार रुपये आणि शेतीसाठी एकरी १ लाख रुपये भरपाई तसेच पुरात वाहून गेलेल्या सर्वसामान्य नागरिकांना घरे बांधून देण्यासाठी योजनेची घोषणा करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यात
मुसळधार पाऊस पडत असल्याने व
पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून,त्यांची जनावरे,शेळ्या मेंढ्या,शेतातील पिकांचे व सर्वसामान्य नागरिकांच्या घराचेही नुकसान होवून त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.त्या शेतकऱ्यांना सरसकट १ लाख रुपये,शेळ्या मेंढ्याना १० हजार रुपये,मृत्युमुखी पडलेल्याच्या वारसाना १० लाख रुपये मदत देण्यात यावी.मृत्युमुखी पडलेल्या जनावरांना सरसकट ५० हजार रुपये मदत देण्यात यावी.तसेच या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे नुकसान झाले आहे,घरे वाहून गेली आहेत त्यांना तात्काळ घर बांधून देण्यासाठी योजनेची घोषणा करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी आणि राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा पावसामुळे नुकसान झालेल्या सर्वांना तत्काळ मदत वितरीत करण्यात यावी.अशी मागणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे करण्यात आली आहे.