पोंदकुळे व पोमन यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी २१ नोव्हेंबर ला तीव्र आंदोलन
जे एम म्हात्रे यांच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी : अकलूज : वाहन निरीक्षक अश्विनकुमार पोंदकुळे व वायूवेग पथकातील असिस्टंट पोमनयांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि जे एम म्हात्रे यांच्या कंपनीमध्ये ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली नसल्याचा निषेधार्थ २१ नोव्हेंबर रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज येथे तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार असल्याचे बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी सांगितले आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या वायूवेग पथकामध्ये कार्यरत असलेले असिस्टंट पोमन साहेब अकलूज मध्ये वाहनांवरती कारवाई करीत असताना पक्षपातीपणा करून कारवाई करीत असून त्यांनी कारवाई करीत असताना त्यांच्या आजूबाजूने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या अनेक वाहने गेली असल्याचा पुरावा आमच्याजवळ असून आम्ही त्यांना त्या वाहनावरती कारवाई करण्यासाठी सुचित केले असता त्यांनी मला कारवाई करता येत नाही मी फक्त एकाच गाडीवर कारवाई करीन असे उत्तर दिल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे या कार्यालयाच्या अंतर्गत काम करत असताना पक्षपातीपणा द्वेष भावना ठेवून या ठिकाणचा वायू वेग पथक काम करीत आहे त्याच पद्धतीने या कार्यालयासमोर दोनच दिवसापूर्वी ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या मांडवे येथील जे एम कंपनीच्या गाड्यांवरती कारवाया करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज यांनी केली नाही.वायू पथकामध्ये काम करणारे सर्व अधिकारी जे म्हात्रे कंपनीच्या कामावरती काम करणाऱ्या वाहनधारकांकडून मंथली हप्ता घेत असल्याची चर्चा आमच्या कानावरती आली असून ओव्हरलोड वाहतूक करण्याचा पुरावा संबंधित कार्यालयात देऊन सुद्धा ते कार्यालय जे एम
म्हात्रे कंपनी वरती काम करणाऱ्या कोणत्याही गाडीवरती कारवाई करीत नाही हा संशोधनाचा विषय आहे,त्यामुळे या वायू वेग पथकाने कारवाई करत असताना त्यांच्या समोरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनावरती कारवाई करणे कम प्राप्त असताना त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यामुळे आमच्या व्हिडिओमध्ये जे वाहनावरती कारवाई न करणाऱ्या त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे तसेच जे एम म्हात्रे यांच्या कंपनीवर काम करणाऱ्या ओव्हरलोड वाहतूक व तेथे कार्यरत असलेल्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई केल्याची माहिती देण्यात यावी.तसेच ट्रॅक्टर चा फोटो पोंदकुळे साहेब यांना दाखवून तो पासिंग करता येतो का याची माहिती विचारण्यात आली मात्र त्यांनी येत असल्याचे सांगितले त्यामुळे ते नियमात बसतंय का नाही याचीही माहिती देण्यात यावी या मागणीसाठी २१ नोव्हेंबर ला मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा बहुजन ब्रिगेड संघटनेने दिला आहे.
