जनतेला भेडसावणारे प्रश्न बहुजन ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून सोडवा- किरण साठे
दहिगाव येथे संघटनेच्या शाखेचे उदघाटन दिमाखात संपन्न
प्रतिनिधी : नातेपुते : बहुजन ब्रिगेड संघटनेच्या दहिगाव ता.माळशिरस शाखेचे उदघाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी शिवप्रसाद उद्योग समूहाचे चेअरमन शरद बापू मोरे, दहिगाव चे सरपंच रणधीर पाटील,उपसरपंच विजयसिंह पाटील,तसेच ग्रामपंचायत सदस्य नितीन मोरे,राहुल सावंत,लखन चव्हाण,बाबुराव खिलारे,किसन खिलारे,केतन यादव,संदीप मदने,नाना खिलारे,धुळा नरुटे,योगेश भांडळे,उदय कांबळे,मनोज डोभाडा धन्यकुमार खिलारे श्रीमंत खिलारे विजय खिलारे महेश चिकणे दहिगाव गावचे पोलीस पाटील विठ्ठल मोरे रंजीत खिलारे शितल खिलारे गणेश खिलारे बापू कापसे महादेव उमापे,परविन मसुगडे प्रताप सावंत इत्यादी उपस्थित होते.
बहुजन ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये बहुजन समाजामध्ये एकी प्रस्थापित करण्याचा उद्देश घेऊन तसेच बहुजन समाजामध्ये फूट पाडणाऱ्या विकृतींना बाजूला करण्यासाठी आणि बहुजन समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने बहुजन ब्रिगेड संघटना काम करत असल्याचे मत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी दहिगाव येथे आयोजित केलेल्या शाखा उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केले.तसेच शाखेच्या माध्यमातून सर्व समाजातील व गावातील अडीअडचणी सोडवून गावाच्या विकासामध्ये हातभार लावून जनतेच्या मनामनात बहुजन ब्रिगेड संघटनेचे काम रुजवून नावलौकिक मिळवावा आणि दहिगाव गावपूरते संघटनेचे काम मर्यादित न ठेवता दहिगाव व पंचक्रोशीतील सर्व गावामध्ये संघटनेच्या माध्यमातून काम करून जनतेला भेडसावत असलेले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना किरण साठे यांनी नूतन पदाधिकारी यांना दिल्या.
दहिगाव शाखेच्या अध्यक्षपदी सचिन खिलारे,उपाध्यक्ष बापूराव बुधावले,सचिव शरद खिलारे,सहसचिव बापूराव दनाने,कार्याध्यक्ष सुनील जगताप, उपकार्याध्यक्ष नाना पवार,संघटक रणजित खंडागळे,संपर्क प्रमुख महादेव खिलारे,खजिनदार साजिद शेख,प्रसिद्धिप्रामुख शिवाजी खिलारे यांच्या निवडी करण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा पवार यांनी केले तर आभार राजू खिलारे यांनी मानले.
