निष्क्रिय रेशनदुकानदार व ग्रामपंचायत प्रतिनिधींच्या नाकर्तेपणा मुळे हजारो नागरीक उपाशी- दत्ता कर्चे

निष्क्रिय रेशनदुकानदार व ग्रामपंचायत प्रतिनिधींच्या नाकर्तेपणा मुळे हजारो नागरीक उपाशी- दत्ता कर्चे

नातेपुते प्रतिनिधी- माळशिरस तालुक्यातील अनेक गावांमधील निष्क्रिय रेशनदुकानदार व ग्रामपंचायत प्रतिनिधींच्या नाकर्तेपणा मुळे हजारो नागरीक रेशनींग न मिळाल्याने संकटाच्या काळात तालुक्यातील अनेक गावांमधील हजारो गोरगरीब सर्वसामान्य जनतेला उपाशी राहायची वेळ या निष्क्रिय लोकप्रतिनिधींनी व रेशनींग दुकानदार यांनी आनलेली आहे 2013 नंतर व काही अशिक्षीत लोकांना ऑनलाइन प्रक्रिया माहीत नसल्याने आज हि परिस्थिती निर्माण झाली आहे. जर रेशनींग दुकानदारांना हि प्रक्रिया जमतनसली तर ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींना ही गोष्ट सांगून सर्वांनी मिळून हे असे जिव्हाळ्याचे विषय एकत्र येऊन सर्वसामान्यांच्या रेशनींगचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज होती परंतु तालुक्यातील निष्क्रिय ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी जसे मतदान मागण्यासाठी घरोघरी जाऊन लोकंचे पाय धरले तसे रेशनींग कार्ड संदर्भात पाठपुरावा करायला हवा होता लोकप्रतिनिधी मतदानाच्या वेळी जेवढे सक्रिय पणे नागरिकांनी मतदान करावे म्हणून पाठपुरावा करतात तेवढा पाठपुरावा केला असता तर आज हजारो नागरिकांना हक्काचे रेशनींग मिळाले आसते.माळशिरस तालुक्यातील अनेक रेशनींग दुकानदार नागरिकांना शासनाचा येणारा माल शासनाच्या नियमानुसार देत नाही लोकांना तुमचे कार्ड ऑनलाइन झाले नाही हे कारण देऊन हजारो क्विंटल रेशनींगचा माल दुकानदार हडप करत आहेत असे या वेळी बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी सांगीतले लवकरच या संदर्भात आम्ही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील नागरीकांच्या रेशनींग समस्या साठी तालुक्यातील अनेक गावांमध्ये बहूजन ब्रिगेड संघटनेची समिती बनऊन सर्वसामान्याना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे व मुजोर भ्रष्टाचारी दुकानदारांना धडा शिकवणार असल्याचे या वेळी दत्ता कर्चे यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom