देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांनी अजित पवार यांची माफी मागण्याची राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी

प्रतिनिधी—अकलूज—भाजपचे माजी मुख्यमंत्री व सद्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांनी अजित दादा पवार यांची जाहीर माफी मागावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी उपविभागीय अधिकारी अकलूज यांना निवेदन दिले आहे.

यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण साठे, जि प सदस्य बाळासाहेब धाइंजे, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर इंगळे देशमुख,जिल्हा संघटक मदन देशमुख,माळशिरस तालुकाध्यक्ष माणिक वाघमोडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पिनू येडगे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबा जाधव,ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पिसे,बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पिंटू एकतपुरे, बंडू कांबळे,सोमनाथ शेळके इत्यादी उपस्थित होते.

भाजपचे माजी मुख्यमंत्री व सद्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित दादा पवार यांच्यावर ७०हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोप केला होता,त्या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे चौकशी दरम्यान सिध्द झाले आहे,त्यामुळे बिनबुडाचे आरोप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर व अजित दादा पवार यांच्यवरती करण्यात आले होते,त्या पाठीमागचा भाजपचा उद्देश हा राष्ट्रवादी काँग्रेस ला व अजित दादा पवार यांना बदनाम करण्याचा होता, हे सिध्द झाले आहे.
अजित दादा पवार यांना बदनाम करण्याचे काम देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांनी केले आहे, वारंवार ७०हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा अजित दादा पवार यांनी जलसंपदा मंत्री असताना केल्याचा आरोप या दोघांनी केलेला होता,त्यांनी केलेला सिंचन घोटाळ्याचा आरोप चौकशी अंती खोटा ठरला असून हा आरोप राजकीय आकसा पोटी केल्याचे निष्पन्न झाले आहे,त्याबद्दल देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.
त्याचबरोबर हे बिनबुडाचे आरोप केल्याप्रकरणी या दोघांनी व भाजपने अजित दादा पवार यांची जाहीर माफी मागावी,अन्यथा विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांना व विनोद तावडे यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom