डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमाना विरोधात बहुजन ब्रिगेड आक्रमक
प्रतिनिधी : करकंब :बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी करकंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना बहुजन ब्रिगेडच्या वतीने निवेदन देवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा रॅप गाण्याच्या माध्यमातून आलोक उपाध्याय यांनी
इन्स्टाग्राम व युव ट्यूब वरती अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरून अपमान केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.त्याच्यावर तात्काळ कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ही बहुजन ब्रिगेड संघटनेने दिला आहे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान प्रकरणावर बहुजन ब्रिगेड संघटना आक्रमक झाली असल्याचे दिसून आले आहे.
यावेळी राजेश खरे,आप्पा शिंदे,स्वप्निल खंकाळ,ग्रामपंचायत सदस्य महेंद्र शिंदे,शिवाजी शिदे,RPI जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे,RPI शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे,सुशांत शिंदे,नेताजी शिंदे,महेंद्र शिंदे, राहुल शिंदे,किरण शिंदे,चंद्रकांत बडेकर,रजनीकांत शिंदे,अतिष शिदे उपस्थित होते.
