करकंब ते मोडनिंब रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करणार – राजेश खरे
प्रतिनिधी : करकंब : करकंब ते मोडनिंब रस्त्याचे चालू असलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून संबंधित कामामध्ये वारपले जाणारे मटेरियल ही गुणवत्तापूर्वक नसून संबंधित कामावर जबाबदार अधिकारीही उपस्थित नव्हते असे बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी सांगितले.
संबंधित कामावर बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे गेले असता कामावर ना ठेकेदार ना जबाबदार असलेले शाखा अभियंता उपस्थित नव्हते कामगारांच्या मनानेच काम चालू होते,खरे यांनी संबंधित ठेकेदाराला फोन लावला असता ठेकेदार यांनी मला जेवढे पैसे मिळतात तेवढेच मी काम करत असतो असे सांगून माझ्याकडे या कामाची इनिविदा नाही असे सांगून टाळाटाळ केली आणि उडवाउडवीची उत्तरे त्यामुळे या कामामध्ये ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने भ्रष्टाचार केला जात असल्याची शक्यता असून ठेकेदार व जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा राजेश खरे यांनी इशारा दिला आहे.
