खा.जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या बनावट दाखला प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसची उडी

खा.जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या बनावट दाखला प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसची उडी

अधिकारी व सूचक यांच्यावर गुन्हा दाखल करणयाची मागणी

प्रतिनिधी—सोलापूर— खा.जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या खोटा दाखला प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली असून खा.जयसिद्धेश्वर महास्वामी यांना खोटा व बनावट जातीचा दाखला देणाऱ्या अधिकारी यांना त्वरित निलंबित करून,त्यांच्या नामनिर्देशन पत्रावर सुचक म्हणून सह्या करणाऱ्यांना आजन्म निवडणूक बंदी घालून संबंधित अधिकारी व सूचक यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी सोलापूर व पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकडे निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी केली आहे. यावेळी सागर कोळी,रफिक मुलाणी,सुरज मोहिते,दत्ता भोळे,उपस्थित होते.

सोलापूर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले खा.जयसिद्धेश्वर यांनी खोटा व बनावट दाखला काढून निवडणूक लढवली असल्याचे स्पष्ट झाले आहे,त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा ही दाखल झाला असून खा जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी शासनाची व जनतेची फसवणूक केली आहे,त्यांना खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातीचा बनावट दाखला देणाऱ्या अधिकारी यांना निलंबित करून त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करावा तसेच लोकसभा निवडणुकीत जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे नामनिर्देशन पत्र भरताना ज्या लोकांनी सुचक म्हणून आपल्या सह्या केल्या आहेत तेही खा.जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याबरोबर तेवढेच दोषी असल्याने त्यांच्यावरही गुन्हा नोंद करून संबंधित सुचकांना आजन्म निवडणूक लढविण्यासाठी बंदी घालावी.आशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर व पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom