
अन्यथा माळशिरस पंचायत समिती ला कुलूप ठोकणार—किरण साठे
प्रतिनिधी—-सोलापूर—माळशिरस तालुक्यातील व प्रामुख्याने अकलूजमधील अंगणवाडीच्या इमारती त्वरित दुरुस्ती करण्यात याव्यात आशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी महिला व बालकल्याण विकास अधिकारी श्री जावेद शेख यांना दिले असून माळशिरस पंचायत समितीला कुलूप ठोकण्याचा इशा दिला आहे.यावेळी सागर कोळी,दत्ता भोळे इत्यादी उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यातील असंख्य अंगणवाडीच्या इमारती नादुरुस्त व मोडखळीस आलेल्या आहेत,त्या अंगणवाडी इमारती मध्ये शाळेत येणारे विद्यार्थी मुठीत जीव धरून बसताना दिसत आहेत,संबंधित अंगणवाडी चालिका ह्या त्या विद्यार्थ्यांना आशा नादुरुस्त इमारती मध्ये शिवविताना दिसत आहेत,संबंधित इमारतीमध्ये सर्व फरशी उकरल्याने त्यामध्ये घुशीनी मोठ्या प्रमाणावर खड्डे पाडले आहेत,त्या घुशीपासून लहान विद्यार्थ्यांना काही बरे वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण आहे?असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी विचारला आहे,त्यामुळे त्वरित आपल्या पंचायत समितीच्या अंगणवाडी संबंधित अधिकारी यांनी तात्काळ पाहणी करून ह्या अंगणवाडी दुरुस्ती करून आवश्यक ती बांधकामासंदर्भत उपाययोजना करून विद्यार्थ्यांना शिकण्या लायक ह्या अंगणवाडीची सोय करावी.असेही निवेदनात म्हटले आहे.
तसेच प्रामुख्याने अकलूजमधील अंगणवाडीच्या इमारती मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त व खराब झालेल्या आहेत,काही अंगणवाडीच्या इमारती खराब व नादुरुस्त असल्याने त्या इमारतीतील विद्यार्थी हे दुसऱ्या इमारती मध्ये बसविण्याचे काम चालू असून माळशिरस तालुक्यातील व प्रामुख्याने अकलूजमधील सर्व अंगणवाडी इमारती येत्या १० ते १५ दिवसात दुरुस्त न केल्यास पंचायत समितीला व संबंधित अंगणवाडी कार्यलयाला कुलूप ठोकले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी निवेदनात दिला आहे.