इस्लामपूर येथे बहुजन ब्रिगेडच्या वतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये मास्क वाटप
प्रतिनिधी—इस्लामपूर
महाराष्ट्र शासनाने इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग चालू करण्याचे आदेश दिल्यानंतर सर्व शाळा सुरू झाल्या आहेत,त्याच अनुषंगाने बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली व बहुजन ब्रिगेड संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या सूचनेनुसार बहुजन ब्रिगेड संघटनेचे नेते शंकर वाघमारे यांनी माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मध्ये सर्व विद्यार्थ्यांना व शाळेतील सर्व शिक्षक यांनाही मोफत मास्क वाटप केले.सदर शाळेमध्ये एकूण दीडशे विद्यार्थी शिकत आहेत,त्यांना सुरक्षित वाटावे त्यामुळे मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी बहुजन ब्रिगेडचे नेते शंकर वाघमारे इस्लामपूर गावचे पोलीस पाटील पप्पू कोळी,शशिकांत धाइंजे,साहेबराव शिंदे,पोपट शेंडगे,संतोष शिंदे,शिवाजी हुलगे,यांच्यासह केंद्रप्रमुख पालवे सर,वारे सर,बोकरे सर,डाकने सर,अर्चना मॅडम इत्यादी उपस्थित होते.
